सातारा – सातारा जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 18 करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. गेल्या काही दिवसांमध्ये करोना पॉझिटिव्ह अहवालांची संख्या घटली असली बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण चिंताजकच आहे.
हे प्रमाण कमी करून जिल्हावासीयांची भीती दूर करण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. जिल्ह्यात आता करोनाबळींची एकूण संख्या 1364 झाली आहे.
सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात उपचार सुरू असताना भोसगाव येथील 58 वर्षीय महिला, अंबवडे, ता. कोरेगाव येथील 70 वर्षीय पुरुष, दत्तनगर, ता. कोरेगाव येथील 70 वर्षीय पुरुष, अंगापूर, ता. सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, लोहोम, ता. खंडाळा येथील 70 वर्षीय पुरुष, लिंब, ता. सातारा येथील 67 वर्षीय पुरुष, जिल्ह्यातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असताना राजेवाडी, ता. माण येथील 73 वर्षीय महिला, कोटेश्वर कॉलनी (करंजे), ता. सातारा येथील 77 वर्षीय पुरुष, लिंब, ता. सातारा येथील 69 वर्षीय पुरुष, कराडमधील 39 वर्षीय पुरुष, नेले-किडगाव, ता. सातारा येथील 52 वर्षीय पुरुष, शाहूपुरी, सातारा येथील 71 वर्षीय पुरुष, तामजाईनगर, सातारा येथील 59 वर्षीय पुरुष, कोपर्डे, ता. सातारा येथील 58 वर्षीय महिला, राऊतवाडी, ता. सातारा येथील 71 वर्षीय पुरुष, पोतले, ता. कराड येथील 80 वर्षीय पुरुष लिंब, ता. सातारा येथील 85 वर्षीय महिला, पाचंगे, ता. खटाव येथील 60 वर्षीय पुरुष, अशा 18 कोविडबाधितांचा मृत्यू झाला. आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
जिल्ह्यातील 422 नागरिक करोनामुक्त
जिल्ह्यातील विविध रुग्णालये, करोना केअर सेंटर व डीसीएचसीमध्ये उपचार घेतलेल्या 422 नागरिकांना रविवारी घरी सोडण्यात आले. त्याचबरोबर 56 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. आतापर्यंत एकूण 33 हजार 533 नागरिकांनी करोनावर मात केली आहे. सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातील पाच, फलटण उपजिल्हा रुग्णालयातील दहा, पानमळेवाडी 20, महाबळेश्वर 16, पिंपोडे पाच, अशा एकूण 56 नागरिकांच्या घशातील स्रावांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, असे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.