पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आज दिवसभरात 141 नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 71 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. शहरामध्ये आजपर्यंत 97 हजार 175 जणांना करोनाची लागण झाली आहे.
मंगळवारी (दि. 5) दुपारी चार वाजेपर्यंत शहरातील 140 रुग्णांचा अहवाल “पॉझिटिव्ह’ आला. तर शहराबाहेरील एकाला करोनाची लागण झाली.
तसेच आज दिवसभरात 3 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 2 व शहराबाहेरील एका रुग्णाचा समावेश आहे. आजपर्यंत 2 हजार 499 इतक्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शहरातील 1 हजार 764 तर शहराबाहेरील 735 रुग्णांचा समावेश आहे.
आज दिवसभरात 71 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 93 हजार 801 इतकी झाली आहे.