सातारा -जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 113 जणांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने मंगळवारी दिली. सोमवारी रात्री उशिरा आलेल्या 91 पॉझिटिव्ह रुग्णांच्या माहितीचा त्यात समावेश आहे. तर मंगळवारी सायंकाळी आखणी 22 रुग्णांची माहिती देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 1865 वर पोहचली आहे.
मंगळवारी सायंकाळी आलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यातील आणखी 22 नागरिकांचा अहवाल करोनाबाधित आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. या 22 करोनाबाधित रुग्णांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे.
कराड तालुक्यातील तळबीड येथील 44, 40, 5 आणि 25 वर्षीय पुरुष, 30, 27, 10 आणि 9 वर्षीय महिला, खोडशी येथील 60, 34 आणि 4 वर्षीय पुरुष, 52, 26 आणि 32 वर्षीय महिला, सैदापूर येथील 50 वर्षीय पुरुष, 19 वर्षीय महिला., पाटण तालुक्यातील कसणी येथील 38 आणि 35 वर्षीय पुरुष, 35, 27 आणि 26 वर्षीय महिला, माण तालुक्यातील बिदाल येथील 28 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
दरम्यान, आरोग्य विभागाकडून सोमवारी (दि. 14) रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील पूर्वीच्या करोनाबाधितांच्या निकट सहवासातील 88 आणि प्रवास करून आलेले तीन, अशा एकूण 91 नागरिकांना करोनाचा संसर्ग झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
त्यानुसार जावळी तालुक्यातील पुनवडी येथील 33, 12, 12, 60, 55, 50, 45, 50, 18 व 45 वर्षे वयाच्या महिला, 12, 5, 34, 34 आणि 51 वर्षे वयाचे पुरुष, सरताळे येथील 50 वर्षांची महिला, सातारा शहरातील बुधवार पेठेतील 12, 13 वर्षे वयाची मुले आणि 35 वर्षांची महिला, शाहूनगरमधील मंगळाई कॉलनीतील 34 वर्षांचा युवक, 56 व 37 वर्षे वयाच्या महिला, मोळाचा ओढा रेणुका हाऊसिंग सोसायटीतील 30 वर्षे वयाचा पोलीस कर्मचारी (नेमणूक वाई पोलीस ठाणे), भैरोबा पायथ्याजवळी 50 वर्षांचा पुरुष, यादोगोपाळ पेठेल 40 वर्षांचा पुरुष, सातारा तालुक्यातील शहापूर येथील 45 वर्षांची महिला, करंडी येथील 48 वर्षांचा पुरुष, 44 व 39 वर्षे वयाच्या महिला, जिहे येथील 66, 42, 57 व 69 वर्षांचे पुरुष, 72, 39, 80, 19, 50, 24, 19 व 32 वर्षांच्या महिला, भरतगाववाडीतील 60 वर्षांची महिला.
कण्हेरमधील 13 वर्षांची मुलगी, वाई तालुक्यातील सोनगीरवाडी येथील 40, 32, 27, 27, 27, 31, 38, 52, 25, 42, 40, 10, 51, 15, 5, 68, 11, 65, 47, 18 वर्षे वयाचे पुरुष, 35, 12, 22 व 60 वर्षे वयाच्या महिला, पाचवडमधील 34 वर्षांचा युवक, कराड तालुक्यातील किवळ येथील 36 वर्षांचा युवक, धावरवाडी येथील 34 वर्षांची महिला, 14 वर्षांचा मुलगा, तारुखमधील 31 वर्षांचा युवक, शेणोली येथील 24 वर्षांचा युवक, विठ्ठलवाडीतील 33 वर्षांची महिला, खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 30 वर्षांची महिला व दहा वर्षांची बालिका, 68, 30, 7, 40, 48 व 39 वर्षे वयाचे पुरुष, नायगावातील 25 वर्षांचा युवक, खटाव तालुक्यातील चितळी येथील 23 वर्षांची महिला
माण तालुक्यातील वारुगड येथील 51 वर्षांचा पुरुष, फलटण तालुक्यातील उपळवे येथील 52 वर्षांचा पुरुष, आसू येथील 30 वर्षांचा युवक, फलटण शहरातील लक्ष्मीनगर येथील 46 वर्षांचा पुरुष, महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी येथील 42 वर्षांची महिला, 23 वर्षांचा युवक, अशा 91 नागरिकांच्या करोना चाचण्यांचे अहवाल सोमवारी रात्री पॉझिटिव्ह आले.
बाधिताचा मृत्यू
सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या 70 वर्षांच्या बाधित पुरुषाचा (रा. वडूज, ता. खटाव) सोमवारी रात्री उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली.
जिल्ह्यात 42 जणांनी केली करोनावर मात
जिल्ह्यातील विविध रुग्णालये व करोना केअर सेंटर्समध्ये उपचार घेत असलेल्या 42 जणांना दहा दिवसांनंतर मंगळवारी घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
माण तालुक्यातील खडकी येथील 44 वर्षांचा पुरुष, इंजबाव येथील 28 वर्षांचा युवक, पळशीतील 33 वर्षांचा युवक, मोगराळे येथील 34 वर्षांचा युवक, धनवडेवाडीतील 30 वर्षांचा युवक, वावरहिरे येथील 35 वर्षांचा युवक, कुळकजाईतील 25 वर्षांचा युवक, कराड तालुक्यातील तळबीड येथील 65 वर्षांची महिला, तारुख येथील 35, 70 वर्षांच्या महिला, 10 व 14 वर्षांच्या मुली, 12 व 15 वर्षांची मुले, विद्यानगर येथील 53 वर्षांची महिला, गोवारे येथील 39 वर्षांचा युवक, कार्वे नाका येथील 24 वर्षांचा युवक, पाटण तालुक्यातील काळकूटवाडी येथील 21 वर्षांचा तरुण, सूर्यवंशीवाडीतील 28 वर्षांचा युवक, जावळी तालुक्यातील सायगाव येथील 60 वर्षांची महिला, सातारा तालुक्यातील संगमनगरमधील 14 वर्षांची मुलगी, सासपडे येथील 23 वर्षांचा युवक, बाबेवाडी येथील 38 वर्षांचा युवक, चोरगेवाडीतील 50 वर्षांचा पुरुष, धावलीतील 17 वर्षांचा युवक, फलटण रोड येथील 20 वर्षांचा युवक, लिंब येथील 39 वर्षांची महिला, जिहे येथील आठ वर्षांचा मुलगा, 20 वर्षांचा युवक, तीन वर्षांची बालिका, 30, 57, 42 व 19 वर्षांच्या महिला, वाई तालुक्यातील उडतरे येथील 33 वर्षांची महिला, वाईतील 53 वर्षांचा पुरुष, पसरणीतील 30 वर्षांचा युवक, धर्मपुरीतील 38, 52 वर्षे वयाच्या महिला, 46 वर्षांचा पुरुष, अभेपुरी येथील एक जण, अशा 42 करोनामुक्तांना टाळ्यांच्या गजरात निरोप देण्यात आला.