हैदराबाद – आंधप्रदेशातील दुब्बक पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार एम रघुनंदन राव यांच्या एका जवळच्या नातेवाईकाकडून एक कोटी रूपयांची बेहिशोबी रोकड जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
त्यात भाजप उमेदवाराचा मेव्हणा सुरभी श्रीनिवास राव यांचाहीं समावेश आहे. बेगमपेट भागातून हा पैसा दुब्बक मतदार संघात नेला जात असताना तो जप्त करण्यात आला. हा पैसा मतदारांना वाटण्यासाठी पाठवला जात होता असा दावा हैदराबादचे पोलिस आयुक्त अंजनीकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
दुब्बक मतदार संघात येत्या 3 नोव्हेंबरला मतदान होत आहे. सुरभी श्रीनिवास राव यांनी मतदारांना वाटण्यासाठीच हा पैसा गोळा केला होता अशी खात्रीशीर माहिती उपलब्ध झाल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले.
भाजपचे माजी खासदार जी विवेक वेंकटस्वामी यांच्या कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या इसमानेच हे पैसे सुरभी श्रीनिवास राव यांच्याकडे दिले होते असेही तपासात निष्पन्न झाले आहे.