बलरामपूर (उत्तर) – या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी सत्तेवर येणार असल्याचे स्पष्ट झाले असून ४ जून नंतर भाजपचे कूळ विघटीत होईल असे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.
शुक्रवारी, पंतप्रधानांनी फतेहपूर येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना इंडिया आघाडीचा कुणबा विघटीत होईल असे म्हटले होते, त्याला उत्तर देताना अखिलेश यांनी ही प्रतिक्रीया दिली.
शनिवारी बलरामपूर येथील निवडणूक रॅलीत पंतप्रधानांची खिल्ली उडवत अखिलेश यादव म्हणाले, चार टप्प्यातील निवडणुकांनंतर भाजपचा चारही आघाड्यांवर पराभव झाला आहे.
भाजपचा रथ अडकलेला नाही, तो कोसळला आहे, असे यादव म्हणाले. लोकांना धमकावून आणि आमिष दाखवून भाजपने निर्माण केलेले कुळ विघटित होईल, असे ते म्हणाले. भाजपला या निवडणूकीत १४० पेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता नाही असे त्यांनी पुन्हा एकदा नमूद केले.