लोणी काळभोर -येथे एका सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्याच्याकडील गावठी कट्टा, तीन जिवंत काडतुसे, कोयता व तलवार अशी घातक हत्यारे मिळून आली आहेत.
याप्रकरणी फैजान ऊर्फ बबलू शकील अन्सारी (वय 22, रा. कदमवाकवस्ती, लोणी काळभोर) यास अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. 15) पेट्रोलिंग सुरू असताना मिळालेल्या माहितीनुसार पोलीस पथकाने या गुन्हेगारास इंदिरानगर चौकात पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अंगझडतीत त्याच्याकडून शस्त्रं जप्त करण्यात आली.