पहिल्या आणि दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये विनाकारण आणि इतरत्र फिरत असताना पोलिसांनी या गाड्या जप्त केल्या आहेत. लॉकडाऊनचा चौथ्या टप्प्यात पुण्यात कंटेंनमेंट भाग वगळता अन्य भागात हळूहळू व्यवहार सुरु होणार आहेत. करोनासोबतच नियमांचे पालन करीत नोकरी, कामधंदा सुरु होणार आहे. सध्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद असल्याने नागरिक स्वतःच्या वाहनांवर अवलंबून असल्याने त्यांना वाहनाअभावी कामकाजाकरिता ऑफिस, व्यवसायाच्या ठिकाणी जाणे शक्य होणार नाही.
\nपोलिसांनी जप्त केलेली वाहने 40 ते 50 दिवसांपासून एकाच ठिकाणी रस्त्यावर, पोलीस स्टेशनच्या आवारात वापराविना पडून आहेत. बॅटरी, इंजिन, टायर इ. खराब होण्याची दाट शक्यता आहे. जोरदार वारा आणि मुसळधार पावसामुळे वाहनांचे नुकसान देखील होऊ शकते. वाहनाचे नुकसान झाल्यास नागरिकांना दुरुस्तीकरिता नाहक खर्चाला आणि त्रासाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे
\nआवश्यक त्या उपाययोजना करून कायद्याच्या चौकटीत वाहने परत देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी ॲड आनंद धोत्रे व ॲड आकाश मुसळे यांनी केली आहे.