Modi spoke withTrump
नवी दिल्ली/वॉशिंग्टन : दोन्ही देशांचे स्वारस्य असणाऱ्या क्षेत्रांत सहकार्य वाढवण्यासाठी आपल्या सोबत आणखी काम करायचे आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांना सांगितले. पंतप्रधानांनी ट्रम्प यांना नववर्षाच्या शुभेच्छाही दिल्या.
आपल्या संभाषणात मोदी म्हणाले, भारत आणि अमेरिकेचे संबंश मजबुतीकडून दृढतेकडे जात आहेत. गेल्यावर्षी झालेल्या सामरिक भागिादारी कराराच्या दिशेने झालेल्या भरीव प्रगतीकडे मोदी यांनी लक्ष वेधले. वॉशिंग्टनमध्येही या दोघांत झालेल्या दूरध्वनीवर झालेल्या चर्चेचा तपशीलाचे निवेदन व्हाईट हाऊसने दिले आहे.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात दूरध्वनीवर चर्चा झाली. त्यांनी परस्परांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. 2020मध्ये भारत आणि अमेरिकेचे संबंध कसे दृढ करता येतील याबाबत दोघांनी आपल्या कल्पना सांगितल्या. तसेच विभागीय सुरक्षेच्या मुद्द्यावरही या दोन नेत्यांत चर्चा झाली असल्याचे या निवेदनांत म्हटले आहे.