बामको, दि. 2 – मालीच्या एका लष्करी तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यात पंधरा जवान ठार झाले आहेत. हा तळ मनेका भागात आहे. या आधी दोन जिहादी दहशतवाद्यांनी बार्किना फासोच्या सीमावर्ती भागात लष्करी तळावर केलेल्या हल्ल्यात चाळीस जण ठार झाले होते.
त्यानंतर झालेला हा दुसरा मोठा हल्ला आहे. शुक्रवारी झालेल्या हल्ल्यात अनेक सैनिक जखमी झाले असून अनेक सैनिक बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या भागात अलकायदाशी संबंधीत जिहादी दहशतवाद्यांचा मोठा वावर आहे. त्यां
च्याकडूनच हा हल्ला झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सन 2012 मध्ये या दहशतवाद्यांनी मोठा उठाव केला होता. पण नंतर फ्रांसच्या लष्कराच्या मदतीने त्यांचा पाडाव करण्यात आला होता. पण अजूनही त्यांनी तेथे लष्करावर संघटीत हल्ले करणे सुरूच ठेवले आहे.