बामको, (माली), – मालीमध्ये सोन्याची एक खासगी खाण कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये किमान ७० जण ठार झाले आहेत. ही दुर्घटना कौतिकोरो प्रांतातल्या कांगाबा जिल्ह्यात गेल्या आठवड्यात शुक्रवारी घडली असून त्याबाबतची माहिती मंगळवारी उघड करण्यात आली.
या ठिकाणी बचाव आणि शोधकार्य अजूनही सुरू आहे. आया अपघातातील मृतांची संख्या आणखीन वाढण्याची भीतीही व्यक्त होते आहे. ही खाण कशामुळे कोसळली हे स्पष्ट होऊ शकले नाही, असे मालीतील खाण मंत्रालयाने म्हटले आहे.
माली हा जगातील तिसर् या क्रमांकाचा सोने उत्पादन करणारा देश आहे. खासगी पातळीवर अनेक ठिकाणी सोन्याच्या खाणी चालवल्या जात असतात आणि तेथे अशा दुर्घटना होण्याचे प्रमाणही मोठे आहे.