मुंबई – जेईई मेन 2021 सेशन्स 4 चा निकाल मंगळवारी रात्री उशिरा घोषीत करण्यात आला. यात 44 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळविले आहेत. तर नंबर 1 रॅंकवर 18 जण आहेत. विशेष म्हणजे यावर्षी 7 लाख 32 हजार विद्यार्थ्यांनी जेईईची परिक्षा दिलेली होती. ज्या 18 जणांनी रॅंक 1 मिळवली असून त्यात महाराष्ट्रातून अथर्व अभिजीत तांबट हा एकमेव मराठी विद्यार्थी आहे.
यात आंध्राचे सर्वाधिक 4 तर त्यापाठोपाठ राजस्थानचे 3, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि तेलंगणाचे प्रत्येकी 2 विद्यार्थी टॉप 18 मध्ये आहेत. भाषिकदृष्ट्या तुलना केल्यास सर्वाधिक 6 विद्यार्थी हे आंध्र-तेलंगणाचे आहेत. नंबर वन वर कर्नाटकचा गौरब दास आहे. तर, 44 उमेदवारांना 100 एनटीए परफेक्ट गुण मिळाले आहेत.
दरम्यान, यंदाच्या वर्षापासून संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) मेन वर्षभरात चारवेळा आयोजित करण्यात येत आहे. जेणेकरुन विद्यार्थ्यांना आपल्या स्कोअरमध्ये सुधारणा करण्याची संधी मिळेल. पहिला टप्पा फेब्रुवारी महिन्यात दुसरा मार्च महिन्यात तिसरा एप्रिल आणि त्यानंतर मे हमिन्यात परीक्षा होणार होत्या मात्र, कोविड19 च्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर त्या स्थगित करण्यात आल्या होत्या. तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा 20 ते 25 जुलै दरम्यान घेण्यात आल्या होत्या तर चौथ्या टप्प्यातील परीक्षा 26 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत घेण्यात आल्या होत्या.