मुंबई – राज्याला काही वर्षांपासून चक्रीवादळ आणि पूरस्थितीचा सातत्याने सामना करावा लागत आहे. तौत्के, निसर्गवादळ तसेच अतिवृष्टीमुळे कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्राची मोठी हानी झाली असून अनेकांचे प्राण गेले आहेत. ही बाब लक्षात घेता चक्रीवादळांचा बंदोबस्त तसेच कायमस्वरुपी उपायोजना करण्यासाठी 3 हजार 200 कोटी रुपये देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.
या निधीच्या मदतीने पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये पूरस्थितीशी सामना करण्यासाठी कायमस्वरुपी उपायोजना करण्यात येणार आहेत.
राज्यात मागील काही दिवसांपासून नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपूर्वी निसर्ग तसेच तौत्के चक्रीवादळाने कौकणात धूमाकूळ घेतला. या वादळामुळे शेतकरी तसेच वापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
शेतकऱ्यांचे उभे पीक आडवे झाले. काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे तर अनेकांचे प्राण गेले. कोकणामध्ये नागरिकांच्या घरात पाणी शिरले. या आपत्तींमुळे कोकणवासीय नेहमीच हैराण असतात. कोकणवासीयांच्या याच संकटाचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी राज्य सरकारने कायमस्वरुपी उपायोजना करण्याचा निर्णय घेतला आहे.
या प्रकल्पांतर्गत सुमारे 3 हजार 200 कोटी पैकी 2 हजार कोटी रुपये राज्य आपत्ती सौम्यीकरण निधीतून खर्च करण्यास आणि उर्वरित 1200 कोटी रुपये पुढील 4 वर्षात (सन 2022-25) राज्याच्या निधीतून उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली.
कोकणातील जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्तींशी सामना करता यावा तसेच आपत्तींचा कायमस्वरुपी बंदोबस्त व्हावा यामुळे राज्य सरकारने तीन हजार कोटी रुपयांचा निधी कोकोणाला दिला आहे.
कोकणातील पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये तीन हजार कोटी रुपयांतून वेगवेगळी कामे केली जातील. यामध्ये प्रामुख्याने धूप प्रतिबंधक बंधारा, शेलटर हाऊस, अंडर ग्राउंड केबलिंग ही कामे केली जाणार आहेत.