चिंबळी – यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात आला.
खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती, चिंबळी येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या वतीने माजी जिल्हा परिषद सदस्या सुरेखा मोहित-पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलास कातोरे यांच्या हस्ते आमदार दिलीप मोहिते पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन केक कापण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब बटवाल, गुरुदास उंबकर, लक्ष्मण कातोरे, अरूण जैद, पंडित कड आदी मान्यवर उपस्थित होते.
करोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार मोहिते यांनी केलेल्या आवाहनाप्रमाणे केवळ सोशल मीडियाद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच लॉकडाऊन लागू झाल्यापासून मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गरजूंना जेवण, मोफत किराणा किट, मास्क, सॅनिटायझर आदी वस्तूंचे वाटप अद्यापही सुरूच आहे. जनतेची सेवाच हेच सगळ्यांत मोठे गिफ्ट आमदार मोहिते यांच्यासाठी ठरले असल्याचे विलास कातोरे यांनी सांगितले.