पुणे – पुणे-मुंबई मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय असणारी “दख्खनची राणी’ अर्थात “डेक्कन क्वीन’ 1 जून रोजी 91 व्या वर्षात पदार्पण करणार आहे. यासह मुंबईहून सुटणारी “पंजाब मेल एक्स्प्रेस’ 1 जून रोजी 108 वर्षांची होत आहे. दरवर्षी थाटात साजरा होणारा “दख्खनच्या राणी’चा वाढदिवस यार्डातच होणार आहे.
1 जून 1930 मध्ये डेक्कन क्वीनचा प्रवास सुरू झाला. सुरुवातीला केवळ शनिवारी आणि रविवारी धावणारी गाडी 26 एप्रिल 1943 पासून दररोज धावत आहे. सुरूवातीच्या काळात 7 डब्यांच्या डेक्कन क्वीनला सध्या 4 एसी चेअर कार, 2 जनरल, 10 द्वितीय श्रेणी चेअरकार आणि 1 डायनिंग कार असे एकूण 17 कोच आहेत.