जेजुरी- पुणे जिल्हा बॅंक आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे नाते अतुट आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी शेती सोसायटींनी आता पूरक उद्योग व्यवसाय उभारावेत. त्यासाठी जिल्हा बॅंक मदतीसाठी पुढाकार घेईल, अशी ग्वाही जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी दिली. जेजुरी (ता. पुरंदर) येथे जयाद्री विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीने उभारलेल्या तीन मजली इमारतीचे उद्घाटन रमेश थोरात यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी कृषी राज्यमंत्री दादा जाधवराव होते. जिल्हा बॅंकेचे संचालक
डॉ. दिगंबर दुर्गाडे, जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप, विभागीय सहाय्यक निबंधक संगीता डोंगरे, सहाय्यक निबंधक महेश गायकवाड, जिल्हा बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण, स्वप्नील फुंदे, सचिन सोनवणे, स्वाती माळवदकर, सुनील असवलीकर उपस्थित होते. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे काम आदर्श आहे. यंदा उच्चांकी सुमारे 220 कोटी रुपये संस्थेला नफा झाला आहे. पंधरा टक्के दराने लाभांश वाटप केले आहे. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष हनुमंत खोमणे, संचालक रामचंद्र भापकर, महादेव माळवदकर, बबनराव बयास, नामदेव जगताप, सुरेश उबाळे, भरत पवार, रजनी बारभाई, संगीता शेवाळे, गणेश शिंदे, सचिव हनीफ सय्यद, सहसचिव अजित जमदाडे यावेळी उपस्थित होते. सुभाष कुतवळ यांनी प्रास्ताविक केले. संचालक महादेव माळवदकर यांनी सुत्रसंचालन केले, तर सचिव हनिफ सय्यद यांनी आभार मानले.