प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसला इशारा ! तरंच चर्चेस तयार…

मुंबई: लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस-राष्ट्रवादीला जोरदार धक्का दिला होता. प्रकाश आंबेडकरांनी लोकसभेसाठी काँग्रेसकडे २२ जागांची मागणी केली होती. मात्र काँग्रेसने नकार दिला. त्यानंतर वंचितने आपले उमदेवार उभे केले. त्याचा फायदा भाजपला तर तोटा काँग्रेस-राष्ट्रवादीला झाला. आता विधानसभा निवडणुकीमध्ये देखील तीच परिस्थिती समोर येत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली. प्रकाश आंबेडकर म्हणाले, काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या वेळी वंचित ही भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला होता. याबाबत काँग्रेसने खुलासा करावा. त्यानंतर आम्ही काँग्रेससोबत चर्चा करू, असा इशारा आंबेडकरांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.