बारामती, (प्रतिनिधी) – नुकताच जाहीर झालेल्या जेइइ मेन परीक्षेत आचार्य अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व असे यश मिळवत अकॅडमीची उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. एनटीएद्वारा दरवर्षी दोन सत्रामध्ये जेईई मेन परीक्षा घेतली जाते. जेईई मेन्स २ परीक्षेचे निकाल जाहीर झाले असून जेईई १ आणि जेईई २ मधील निकालातून सर्वोत्तम गुणांचा विचार केला जातो.
त्यामधून जेईई मेन्स अंतिम निकाल जेईई ऍडव्हान्ससाठी निर्णायक ठरवला जातो. यामध्ये बारामतीच्या १७२९ आचार्य अॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी मोठे यश संपादन केले आहे. अॅकॅडमीत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रभुपार्थ अधिक चौधर (९९.३२), धीरज संपतराव माने (९९.०७) आणि ओजस महावीर शहा (९९.०३) यांचा समावेश आहे.
याखेरीज ओम प्रमोद पवार (९८.७९), प्रथमेश दीपक चांदगुडे (९८.५६), स्नेहा गणेश जगदाळे (९८.२९ ), समर्थ संजय मुंगसे (९८.२९), मयुर भरत निकम (९८.०५), संदेश कुंडलिक वाबळे (९७.४१), रणवीर नंदकुमार घाडगे (९७.२७), मधुरा रत्नदीप भास्करे (९७.१८),
शविरा संग्रामसिंह गायकवाड (९७.०७), पायल पांडुरंग दगडे (९६.३४), श्रृती संतोष लोखंडे (९६.३४), दिव्या संतोष जाधव (९६.०३), श्रीहरी संजय गायकवाड (९६.००), सुमित सुधीर पलांडे (९५.९७), रोहन यादव (९५.७६), सोज्वल रमणिक चवरे (९५.००) यांसह ७० हून जास्त विद्यार्थी जेईई ऍडव्हान्ससाठी पात्र झालेले आहेत.
अवघ्या सात वर्षामध्ये १७२९ आचार्य अॅकॅडमीने उत्तुंग यश संपादन करणारे विद्यार्थी घडविणारी संस्था म्हणून नावलौकिक मिळविला असून बारामतीसोबत पुण्यात वाकड येथेही आपली शाखा सुरु केलेली आहे. नुकतीच इंदापूर येथेही नव्याने शाखा सुरू केली असून येथेही विद्यार्थी आणि पालकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.
१ मे रोजी पालकांच्या आग्रहास्तव आपण रहाटणी येथे नवीन शाखा सुरू करत आहोत त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी निवासासोबतच पिकअप आणि ड्रॉप ची सुविधा देखील उपलब्ध केली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थापक प्रा. ज्ञानेश्वर मुटकूळे, संचालक प्रा. सुमीत सिनगारे, संचालक कमलाकर टेकवडे आणि संचालक प्रा. प्रवीण ढवळे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.