विषेश विमानाने उदयनराजे जाणार मुख्यमंत्र्यांबरोबर

राष्ट्रवादीला पश्‍चिम महाराष्ट्रात मात देण्यात भाजपा यशस्वी झाल्याचे राजकीय अभ्यासकांचे मत

सातारा, मुंबई :- उदयनराजे भोसले शनिवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमीत शहा, रस्ते विकास आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सोहोळा होईक असे उदयन राजे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, राजे दिल्लीला मुख्यमंत्र्यांसोबत विशेष विमानाने जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकतील भाजपाच्या अभूतपूर्व यशानंतर भाजप सेनेकडे कॉंक्रेस भाजपामधून जाणाऱ्यांचा ओघ वाढला आहे. उदयनराजे मात्र शरद पवार यांची साथ सोडणार नाहीत असे मानले जात होते. या पार्श्‍वभूमीवर राजे यांच्या निकटवर्तीयांनी गुरूवारी भाजपप्रवेश निश्‍चित असल्याचे सांगितले. शुक्रवारी सकाळी त्यांनी ट्‌विट करत याची अधिकृत घोषणा केली.

राजे यांच्या पक्षबदला पाठोपाठ रामराजे निंबाळकर यांनीही शिवसेनेचा भगवा हातात घेतल्याचे बोलले जात आहे. मात्र, आज आपण राष्ठ्रवादीतच आहोत. उद्याचे माहित नाही, असे त्यांनी शनिवारी पत्रकारांना सांगितले. पश्‍चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे प्राबल्य होते. तेथेच त्या पक्षाला नेस्तनाबूत करण्याची भाजपाने योजना आखली त्यात ते यशस्वी झाले असे मानले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.