माझ्या आयुष्यातला हिरो माझ्या व्यवसायातला नाही

तापसी पन्नू गेल्या काही दिवसांपासून लाईमलाईटमध्ये आहे. त्याचे कारण तिच्या प्रोफेशनल लाईफशी संबंधित नसून पर्सनल लाईफशी संबंधित आहे. तापसी पन्नूचे अफेअर सुरू असल्याची जोरदार चर्चा बी-टाऊनमध्ये सुरू आहे. तिचा बॉयफ्रेंड नक्की कोण आहे, याबाबत वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत. या अंदाजावरूनच बॉलीवूड गॉसिप मॅगझिन्समधील रकानेच्या रकाने भरले गेले. अखेर तापसीने या विषयावर स्वतःहून बोलण्याचा निर्णय घेतला.

माझ्या आयुष्यात जो कोणी हिरो आहे. तो माझ्या प्रोफेशनमधील नाही. लोकांना ज्या व्यक्ती बद्दल अंदाज वाटत असेल, तो तर नक्कीच नाही. माझ्या पर्सनल लाइफमधील जोडीदार ऍक्‍टर किंवा क्रिकेटपटू देखील नाही, असे तापसीने सांगितले. आपले अजून लग्न झालेलं नाही, त्यामुळे आपल्यासमोर जोडीदार निवडण्याचे पर्याय खुले आहेत. आपल्यालाही अन्य कोणासारखे लग्न करून संसार थाटायला आवडेल, मुलांना जन्म द्यायलाही आवडेल, असंही तिने सांगितले. अर्थात लग्नात कोणताही गाजावाजा होणार नाही आणि अगदी एका दिवसातच लग्नाचा समारंभ उरकला जाईल, असा आपला कटाक्ष असल्याचे तिने स्पष्ट केले.

“वर्कफ्रंट’च्या बाबतीत बोलायचे तर “सांड की आंख’ मध्ये ती भूमी पेडणेकर बरोबर असणार आहे. याशिवाय “रश्‍मी रॉकेट’ आणि “थप्पड’ यासारखे सिनेमेही तापसीकडे आहेत. तिच्या अन्य सिनेमांपेक्षा “गेम ओव्हर’ला कमी प्रसिद्धी मिळाली होती. “नाम शबाना’मध्ये फाईटर असलेली तापसी “गेम ओव्हर’मध्ये गुंडांसमोर असहाय्य झालेले बघवत नव्हते. पण अशाप्रकारे वेगळे रोल निवडण्याचीच तिची ईच्छा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)