युरोपिय संघाला “ब्रेक्‍झिट’ला मंजूरी हवीच

ब्रुसेल्स : युरोपिय संघाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी “ब्रेक्‍झिट’च्या करारास मान्यता देण्याच्या योजनेवर ब्रिटनवर आणखीनच दबाव आणला. तत्पूर्वी युरोपियन नेत्यांनी ब्रेक्‍झिटच्या विलंबासाठी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या नाखुषीने केलेल्या विनंतीचा विचार केला. त्यानंतरही युरोपिय संघाने ब्रिटनच्या संसदेकडून “ब्रेक्‍झिट’च्या मंजूरीची अपेक्षा केली आहे.

ब्रिटीश खासदारांनी जॉन्सन यांना युरोपिय कौन्सिलचे अध्यक्ष डोनाल्ड टस्क यांना माघार घेण्यास मुदतवाढ देण्याची विनंती करण्यास भाग पाडले. त्यानंतर रविवारी इतर 27 सदस्य देशांतील राजदूतांनी व युरोपिय संघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची रविवारी भेट घेतली.

युरोपियन युनियनने सर्व पर्याय खुले ठेवले आहेत. म्हणूनच मंजुरीची प्रक्रिया सुरू केली आहे. करारास मंजूरी मिळाल्यास तो सोमवारी युरोपियन संसदेकडे सुपूर्द केला जाऊ शकेल, असे युरोपियन संघच्या अधिकाऱ्याने सांगितले. या मुदतवाढीबाबत युरोपिय संघाकडून ब्रिटनच्या संसदेकडे स्पष्टिकरणही मगितले जाईल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.