लंडन – मूळ भारतीय असलेल्या गुन्हेगारांच्या टोळीवर ब्रिटनमध्ये प्रतिबंधक आदेश लागू करण्यात आले आहेत. प्रतिबंधक आदेश लागू केलेल्या या टोळीमध्ये वस्तूंची आणि मानवी तस्करीच्या गुन्ह्यांमध्ये दोषी आढळलेल्या ९ गुन्हेगारांचा समावेश आहे.
स्वंदर ढल, जसबीर कपूर, दिलजान मल्होत्रा, चरण सिंग, वालजीत सिंग, जसबीर धल सिंग, जगिंदर कपूर, जॅकदर कपूर आणि अमरजीत अलाबादीस अशी या गुन्हेगारांची नावे आहेत.
या सर्वांना ब्रिटनमधून दुबईमध्ये छुप्या मार्गाने १५.५ दशलक्ष पौंडांची तस्करी करण्याच्या गुन्ह्यात दोषी ठरवले गेले होते. प्रतिबंधक आदेशांद्वारे त्यांच्या आर्थिक व्यवहारांवर निर्बंध, तुरुंगवासाची शिक्षा, खात्यांच्या व्यवहारांवर बंदी आणि आंतरराष्ट्रीय प्रवासावर बंदी घातली गेली आहे.