After Japan, the UK faces a slowdown :– करोनामुळे विविध अर्थव्यवस्थावर परिणाम झाला आहे. त्यानंतर जगात दोन युद्ध सुरू आहेत. याचा जागतिक व्यापारावर परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत अनेक देशांच्या अर्थव्यवस्था पिछाडीवर पडत आहेत. जपान मधील उत्पादकता आणि स्पर्धात्मकता कमी झाल्यामुळे ही अर्थव्यवस्था आता मंदीत गेली आहे.
अगोदर जपान जगातील तिसरी अर्थव्यवस्था होता. तो आता चौथ्या क्रमांकावर गेला आहे. तर चौथ्या क्रमांकावरील जर्मनी तिसर्या क्रमांकावर गेली आहे. जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असलेली ब्रिटनची अर्थव्यवस्थाही मंदीत गेली आहे. भारत या क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर आहे. मात्र दरडोई उत्पन्नात भारत अनेक देशाच्या मागे आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार जपानमधील स्पर्धात्मकता कमी झाली आहे.उत्पादकता कमी झाली आहे. ती वाढविण्यासाठी जपानकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. कारण जपानमधील लोकसंख्या वाढीचा दर कमी आहे. तो वाढविण्यासाठी प्रयत्न करूनही यात जपान सरकारला यश आले नाही. जपान 2010 पर्यंत जगातील दुसर्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होता. पहिल्या क्रमांकावर अमेरिका होती आणि आहे. मात्र 2010 मध्ये चीनची अर्थव्यवस्था वाढल्यामुळे चीन दुसर्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाला होता. जपान तिसर्या क्रमांकावर होता. आता तो चौथ्या क्रमांकावर गेला आहे.
सध्या जपानचा विकासदर नकारात्मक पातळीवर म्हणजे शून्य टक्क्याच्या खाली आहे. गेल्या वर्षी जपानचा विकास दर 1.9% इतका होता. त्यामुळे आता ही अर्थव्यवस्था मंदीत गेल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. जर्मनी आणि जपान मधील अर्थव्यवस्थामध्ये मोठ्या कंपन्यापेक्षा छोट्या आणि मध्यम आकाराच्या कंपन्या जास्त योगदान देतात. जपानच्या अर्थव्यवस्थेत या अगोदर वाहन क्षेत्राचे मोठे योगदान होते. मात्र आता इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत या क्षेत्रात जपान मात्र मागे पडला आहे.
DA Hike| 1 कोटी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्ता वाढ लवकरच जाहीर होणार
दुसर्या महायुद्धानंतर जपानमधील जनतेने आणि कंपन्यांनी अथक परिश्रम केले आणि युरोप आणि अमेरिकेतील उत्पादनापेक्षा जपान मधील उत्पादने कमी किमतीची पण अधिक दर्जेदार बनविली. त्यामुळे मेड इन जपान या संकल्पनेला जगभरातून आदर मिळत होता. मात्र आता या बाबी वेगाने इतिहास जमा होत असल्याचे दिसून येत आहे. जपानी जनता यातून कसा मार्ग काढते याकडे जागतिक गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.
विकासदर नकारात्मक पातळीवर
सलग दोन तिमाहीत उत्पादकता नकारात्मक असल्यानंतर त्या देशात मंदी समजली जाते. ब्रिटनमध्ये गेल्या तीन तिमाहीपासून उत्पादकता शून्य टक्क्यापेक्षा कमी आहे. त्यामुळे ब्रिटनमध्येही मंदी निर्माण झाली असल्याचे समजले जाते. करोनानंतर ब्रिटनमध्ये व्याजदर उच्च पातळीवर असल्यामुळे भांडवलाचा वापर कमी होत आहे. त्यामुळे या अर्थव्यवस्था मंदीत जात आहेत. जर व्याजदर कमी केले तर त्यामुळे महागाई भडकण्याचा धोका असतो.