पतीची हत्या करून मृतदेह गाडला; त्यावर उभारले स्वयंपाकघर

भोपाळ : व्यवसायाने वकील असणाऱ्या पतीची हत्या करून त्याचा मृतदेह घरातच गाडून त्यावर स्वयंपाक उभारल्याची घटना मध्य प्रदेशातील अन्नुपूर गावात उघडकीस आली.

प्रतिमा बनवाल (32) ही महिला अन्नपूरपासून 30 किमी अंतरावरील कोटमा गावातील रहिवासी आहे. तिने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी पती मोहीत (34) बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती, असे उपविभागीय पोलिस अधिकारी के. एन. प्रसाद यांनी सांगितले.

ते म्हणाले, मोहितचा भाऊ अर्जुन हा प्रतिमा यांना भावाच्या बेपत्ता होण्याचे कारण वारंवार विचारत असे. त्या मुद्‌द्‌यावर त्या त्याच्याशी भांडण काढत असत. अर्जुन आणि शेजाऱ्यांना त्या घरात घेत नसत. कोणी येण्याचा प्रयत्न केल्यास त्याला शिविगाळ करून त्या बाहेर काढत. त्यामुळे त्यांच्यावर संशय वाढला.

ज्यावेळी लोकांनी त्यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्या कुलूप लावून निघून गेल्या. मात्र ते तोडून शेजाऱ्यांनी घरात प्रवेश केला. त्यावेळी त्यांना घरातून दूर्गंधी आली. त्यांनी पोलिसांना पोलिसांना पाचारण केले. त्यावेळी पोलिसांनी स्वयंपाक घर खणले त्यावेळी तेथे त्यांना मोहीतचा मृतदेह सापडला.

तो शवविचछेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्यांनी 22 ऑक्‍टोबरला मोहीतचा वायरने गळा आवळून केला. तो जमीनीत गाडून त्यावर स्वयंपाक घर उभारले, असे पोलिसांनी सांगितले. प्रतिमा यांना अटक करण्यात आली. गुन्ह्याचा हेतू तपासात उघड होईल, असे प्रसाद यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.