कोलकाता : भारताविरूध्दच्या कसोटी मालिकेतील दुस-या व पहिल्या ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणा-या बांगलादेशने ईशांत शर्मासमोर नांगी टाकली. भारतीय वेगवान गोलंदाजाच्यासमोर बागंलादेशचा पहिला डाव ३०.३ षटकांत १०६ धावांवर संपुष्टात आला.
A pumped up @ImIshant after he picks up his 5-wkt haul in the #PinkBallTest.#TeamIndia pacers have bowled out Bangladesh for 106 runs in the first innings. pic.twitter.com/Z3k0yvEwlM
— BCCI (@BCCI) November 22, 2019
ईशांत, उमेश आणि शमी या त्रिकूटाच्या भेदक मा-यासमोर बांगलादेशी फलंदाजाची चांगलीच दाणादाण उडाली. बांगलादेशचे चार फलंदाजाना तर भोपळाही फोडता आलेला नाही. कर्णधार मोमिनुल हक, मोहम्मद मिथून, मुशफिकुर रहीम आणि अबू जाएद शून्यावर बाद झाले. तर शदमन इस्लाम २९,लिटन दास २४, नईम हसन १९, मेहदी हसन ८, महमूदुल्लाह ६ आणि इमरूल केस ४ धावांवर बाद झाले.
A brilliant 5-wkt haul for our pacer @ImIshant in the #PinkBallTest 🙌🙌
Live – https://t.co/kcGiVn0lZi pic.twitter.com/fh4NC22hfF
— BCCI (@BCCI) November 22, 2019
भारताकडून गोलंदाजीत ईशांत शर्माने १२ षटकात २२ धावा देत सर्वाधिक ५ गडी बाद केले. उमेश यादवने ३ आणि मोहम्मद शमीने २ गडी बाद करत ईशांत शर्माला उत्तम साथ देत बांगलादेशचा डाव ६३ धावांवर संपुष्टात आणला.