पणजी : आशियातील सर्वात जुन्या चित्रपट महोत्सवाचे अर्थात “इफ्फी महोत्सव-2019” गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर सुरु झाला असून, यंदा या महोत्सवाचे हे 50 वे वर्ष आहे. हा महोत्सव गोव्यातील पणजी इथे बांबोलिम येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. 28 नोव्हेंबरपर्यंत हा महोत्सव चालणार आहे.
दरम्यान, या महोत्सवात आज ‘मेघा’ज डीव्होर्स’ ह्या शॉर्ट फिल्मचा प्रिमियर पाड पडला. ही 11 मिनिटांची हिंदी शॉर्ट फिल्म असणार आहे. अभिनेत्री ‘मंजिरी फडणवीस’ या फिल्ममध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ही शॉर्ट फिल्म 11 चित्रपटांच्या संकलनाचा एक भाग आहे जो इंग्रजीमध्ये 1 तास 40 मिनिटांचा वैशिष्ट्यपूर्ण सादर करण्यात आला आहे.
या शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शन अॅवॉर्ड विजेते दिग्दर्शक निला माधब पांडा ह्यांनी केले आहे. ‘मेघा’ज डिव्होर्स ही शॉर्ट फिल्म जगभरातील विविध घटस्फोटांचा अभ्यास करुन बनवण्यात आली आहे. या शॉर्टफिल्मच्या माध्यमातून मंजिरी अभिनेत्री दिव्या दत्तासोबत स्क्रिन शेअर करत आहे.