टिकटॉकचा व्हिडीओ बनविण्याच्या नादात एकाचा खून

शिर्डी – शिर्डी शहरात मंगळवारी झालेल्या गोळीबारातील एकाचा खून झाला. याप्रकरणी पोलिसांकडून एक बाब उघडकीस आली आहे. हा प्रकार टिकटॉकचा व्हिडीओ बनविण्याच्या नादात मित्राकडून गावठी कट्ट्यातून सुटलेल्या गोळीने त्याचे प्राण घेतले, अशी माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली.

शिर्डी शहरात गजबजलेल्या नालारोडलगत असलेल्या एका हॉटेलवर सायंकाळी फ्रेशअपसाठी रूम घेतला होता. मंगळवारी (दि. 11) सायं. 6 वाजेच्या सुमारास ही मुले टिकटॉकवर टाकण्यासाठी व्हिडिओ तयार करत होती. यात गावठी कट्टयाचा वापर करण्यात आला. आरोपी सनी पवार याच्या हातातील कट्यातून गोळी सुटून नात्याने चुलत दाजी सनी पोपट असलेल्या शिर्डी लक्ष्मीनगर या भागात राहणाऱ्या प्रतिक ऊर्फ भैय्या संतोष वाडेकर (वय 19) या तरुणाचा जीव घेतला. मयताच्या छातीत गोळी घुसल्याने त्याचा जागेवर मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर चारजण पसार झाले.

घटनास्थळी उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी भेट दिली होती. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले. सनी पवार याने खुनाची कबुली दिली. त्याच्याकडे गावठी कट्टा व एक राऊंडदेखील जप्त करण्यात आला. पवार याचा सहकारी नितीन अशोक वाडेकर याला देखील ताब्यात घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.