महिलांना नेता होण्याची संधी

राज्य महिला अध्यक्षा विजया रहाटकर यांचे प्रतिपादन

नगर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या सर्व लाभाच्या योजना महिलांना केंद्रस्थानी ठेवून प्रभावीरित्या राबविल्या आहेत. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बंधुत्वाच्या नात्याने महिलाचे प्रश्‍न सोडविण्याबरोबरच महिलांकरिता विविध योजना राबविल्या आहेत. यासर्व योजना भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक महिलेपर्यंत पोहचवाव्यात. भाजपने संपूर्ण देशात सदस्य नोंदणी अभियान सुरु केले आहे. यावेळी 20 कोटी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट आहे. म्हणून महिला पदाधिकाऱ्यांना सदस्य नोंदणीच्या कार्यात जास्तीत जास्त काम करुन महिलांना नेता होण्याची उत्तम संधी आहे, असे प्रतिपादन भाजपाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले.

भाजपाच्या राष्ट्रीय महिला आघाडीच्या अध्यक्षा विजय रहाटकर नगरला लक्ष्मी कारंजा येथील भाजपा कार्यालयास त्यांनी धावती भेट दिली. यावेळी शहर महिला आघाडीच्यावतीने अध्यक्षा गितांजली काळे यांनी त्यांचे स्वागत करुन सत्कार केला. याप्रसंगी भाजप प्रदेश महिला सरचिटणीस उमा खापरे, राष्ट्रीय महिला संयोजिका उषा वाजपेयी, शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी, उपमहापौर मालन ढोणे, महिला बालकल्याण सभापती लता शेळके, नगरसेविका सोनाली चितळे, भिंगार कॅन्टोंमेंटच्या शुभांगी साठे, शहर संघटन सरचिटणीस किशोर बोरा आदिंसह महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या. यावेळी विजया रहाटकर यांनी कमल सखी संवाद, रक्षाबंधन उत्सव आदि संपर्क अभियानाचे उपक्रमबद्दल सविस्तर माहिती देऊ सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी नगरमध्ये प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन केले.

दिलीप गांधी यांनी, लक्ष्मी कारंजा येथील भाजपाच्या कार्यालयात जनसंघापासूनचे अनेक प्रादेशिक व राष्ट्रीय नेते येऊन गेले आहेत. मात्र राष्ट्रीय महिला अध्यक्षा प्रथमच या कार्यालयात आल्या. त्यांचे स्वागत करतांना आनंद होत आहे. भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून मंत्री विजया रहाटकर यांनी चांगले काम करण्याबरोबरच त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणूनही उत्कृष्ट काम करत आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला असल्याचे सांगितले.

प्रास्तविकात शहराध्यक्षा गितांजली काळे म्हणाल्या, नगर शहरामध्ये महिलांचे मजबूत संघटन आहे. प्रत्येक निवडणुकीत महिला पदाधिकारी आपली जबाबदारी उत्कृष्टपणे निभावत आहेत. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही विजयासाठी पक्षाने दिलेले सर्व कार्यक्रम प्रभावीपणे राबवून शहरातून महिलांची जास्तीत सदस्य नोंदणी करण्यावर भर देत आहोत.
उपमहापौर मालन ढोणे यांनी भाजपाचे नूतन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व मंगलप्रभात लोढा यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला, उपस्थित सर्वांनी टाळ्यांनी मंजूर केला. यावेळी कालिंदी केसकर, निर्मला भंडारी, वंदना पंडित, सुरेखा विद्ये, सविता तागडे, ज्योती सैंदाणे, ज्योत्सना मुंगी, संगीता मुळे, कल्पना भळगट आदिंसह महिला पदाधिकारी व कार्यकर्त उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)