नगर शहराच्या विकासासाठी निधी देण्यात यावा : राठोड 

नगर – गेल्या अनेक वर्षांपासून या शहरात पाहिजे तसा विकास झाला नाही. नगरशहराकडे महाराष्ट्र शासनाचे दुर्लक्ष झाले आहे आता युतीचे सरकार आहे. त्यामुळे नगरशहराच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी उपलब्ध करून द्यावा आणि तसेच नगर एम.आय.डी.सी मध्ये नवीन कंपन्या उभारण्यासाठी परवानगी द्यावी जेणे करून नगर शहरात रोजगार उपलब्ध होईल यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी भेट घेवून यासंदर्भात बैठक घेतली.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले या सर्व मुद्द्यांवर आराखडा तयार करून नगरशहराच्या विकासासाठी निधी व रोजगारासाठी नवीन कंपन्या उभारण्यासाठी काम सुरु केले जाईल. यावेळी शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक शाम नळकांडे, भगवान फुलसौंदर, दत्तात्रय नागपुरे, मंदार मुळे, शुभम बेद्रे, किरण बोरुडे उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)