हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मतदान करतानाचा व्हिडिओ व्हायरल

कोल्हापूर – हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील भवानीनगर येथील भागवत जाधव या मतदाराने मतदान करतानाचा स्वत:चा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल केला आहे. त्यामुळे मतदान केंद्रांवरील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मतदान व्हायरल होऊ नये, यासाठी निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांवर मोबाईल घेऊन जाण्यास निर्बंध घातले आहेत. तरीही भागवत जाधव याने स्थानिक कार्यकर्त्यांशी असलेल्या इर्षेतून मतदान केंद्रात मोबाईल नेला व आपल्या मतदानाचे चित्रीकरण करून व्हिडिओ व्हायरल केला. अनेक मतदान केंद्रांवर पोलिसांनी मोबाइलबंदी केली आहे. मात्र, पोलिसांची नजर चुकवून मतदार मोबाइल घेऊन केंद्रांवर जात आहेत. मोबाइलबंदीचा फारसा परिणाम झालेला दिसत नसल्याचं यातून स्पष्ट झाले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)