नवी दिल्ली – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांची बदनामी करणारा व्हिडीओ सोशल मिडीयावर टाकल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले मुक्त पत्रकार प्रशांत कनोजीया यांच्यावरील कारवाईच्या विरोधात सुप्रीम कोर्टात दाखल आज सुनावणी करण्यात आली. यावेळी सुप्रीम कोर्टाने उत्तरप्रदेश सरकारला फटकारले आहे. आणि कनोजीया यांच्या तात्काळ सुटकेचे आदेश दिले आहेत. या अटकेच्या विरोधात कनोजीया यांच्या पत्नीने दाखल केलेली याचिका आज सुटीकालीन खंडपीठापुढे सुनावणीसाठी आली.
सुप्रीम कोर्टाने म्हंटले कि, प्रत्येकाचे मत वेगवेगळे असू शकते. हे ट्विट करणे योग्य नव्हते. परंतु, या आधारावर कोणलाही अटक करता येणार नाही. कोणालाही एका ट्विटसाठी ११ दिवस जेलमध्ये ठेवता येणार नाही. हे काही हत्येचे प्रकरण नाही. त्यांना तात्काळ सोडण्यात यावे, असे आदेशही कोर्टाने दिले. तसेच कोणत्याही व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्यात येत असेल तर आम्ही हस्तक्षेप करणार असून राज्य सरकार आपला तपास चालू ठेऊ शकतात. परंतु, कनोजीया यांना अटकेत ठेऊ शकत नाही.
Supreme Court orders immediate release of freelance journalist, Prashant Kanojia who was arrested by UP Police for 'defamatory video' on UP Chief Minister. pic.twitter.com/OTr47uEVSu
— ANI (@ANI) June 11, 2019
Supreme Court asks the Uttar Pradesh Government to "show magnanimity in releasing" freelance journalist, Prashant Kanojia. (file pic) pic.twitter.com/iw6DIIPI1v
— ANI (@ANI) June 11, 2019
Supreme Court hearing plea of freelance journalist, Prashant Kanojia observes, "Liberty of citizen is sacrosanct and non-negotiable. It is guaranteed by the constitution and it cannot be infringed." https://t.co/JDbBjgMXqC
— ANI (@ANI) June 11, 2019
काय आहे प्रकरण
एका महिलेने आपण मुख्यमंत्र्यांना विवाहाचा प्रस्ताव दिला असल्याचा दावा केला होता. व आपल्याला त्यांच्याशी विवाह करायचा आहे असे ती महिला मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याच्या बाहेर विविध वाहिन्यांच्या पत्रकारांना सांगत असल्याचा व्हिडीओ या पत्रकाराने सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यावरून मुख्यमंत्र्यांची बदनामी केली या कारणावरून उत्तरप्रदेश पोलिसांनी काल कनोजीया यांनी अटक केली आहे. पत्रकार कनोजीया यांना करण्यात आलेल्या अटकेचा एडिटर गिल्ड ऑफ इंडिया आणि अन्य पत्रकार संघटनांनी निषेध केला आहे.