पुणे – पावसाळ्यात आरोग्य केंद्रांमध्ये पुरेशी औषधे ठेवा

पुणे – पावसाळ्यात जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयांमध्ये व आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा साठा करून ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभागाला दिले आहेत.

पावसाळ्यादरम्यान आपत्तीसारखी परिस्थिती निर्माण झाली अथवा साथीचे आजार पसरल्यास करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. त्यावेळी या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ उपलब्ध असलेली सर्व उपकरणे, ऍम्ब्युलन्स, जीप, जनरेटर्स आदी सुस्थितीत व चालू स्थितीमध्ये आहे का, याची शहानिशा करणे.

तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी आरोग्य केंद्रामध्ये नियंत्रण कक्ष उभारणे. आणीबाणीच्या कामासाठी स्थानिक डॉक्‍टर अथवा स्वयंसेवक संघटना यांना तातडीने एकत्रित करणे, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर पावसाळ्यात साथीच्या रोगाचा प्रसार होऊ नये, म्हणून उपाययोजना करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.

24 तास आरोग्य केंद्र सुरू ठेवा
पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीमध्ये लागणाऱ्या आरोग सेवांचे अधिकारी- कर्मचाऱ्यांची नावे, मोबाइल नंबर, फोन नंबर यांची माहिती अद्ययावत करण्यात आलेली आहे. तसेच जिल्ह्यात एकूण 96 प्राथमिक आरोग्य केंद्र असून ते 24 तास कार्यरत ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.