शिर्डीत लोखंडे, तर नगरमधून विखे खासदार!

शरद पवार, थोरातांच्या प्रतिष्ठेवर पाणी : संथगतीने मतमोजणीमुळे निकाल रेंगाळला

शिर्डी लोकसभा मतदारसंघ उमेदवारनिहाय मिळालेली मते

आ. भाऊसाहेब कांबळे- 3 लाख 66 हजार 625, ऍड. बन्सी सातपुते- 20 हजार 300, खा. सदाशिव लोखईडे- 4 लाख 86 हजार 820, सुरेश जगधने- 6 हजार 6, अशोक जाधव- 1970, ऍड. प्रकाश आहेर- 1507, विजय घाटे- 1820, संजय सुखदान- 63 हजार 287, ऍड. अमोलिक गोविंद- 1 हजार 488, अशोक वाकचौरे- 3 हजार 592, किशोर रोकडे- 1704, गणपत मोरे- 1692, प्रदिप सरोदे- 12 हजार 946, बापू रणधीर- 2 हजार 475, शंकर बोरगे- 1 हजार 930, भाऊसाहेब वाकचौरे- 8 हजार 225, भाऊसाहेब वाकचौरे- 35 हजार 526, सचिन गवांदे- 1 हजार 665, सुभाष त्रिभूवन- 3 हजार 100, संपत समिदंर- 1 हजार 290, नोटा- 5 हजार 394 एकूण- 10 लाख 29 हजार 362

नगर – राज्यासह देशाचे लक्ष लागलेल्या व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जातीने लक्ष घालून प्रतिष्ठेच्या केलेल्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी विक्रमी मताधिक्‍याने विजय मिळविला. त्यांना 6 लाख 93 हजार 665 मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना 4 लाख 17 हजार 955 मते मिळाली. विखेंनी आ.जगतापांचा तब्बल 2 लाख 75 हजार 710 मतांनी पराभव केला. शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी आपले प्रतिस्पर्धी कॉंग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांचा 1 लाख 20 हजार 195 मतांनी पराभव केला. खा. लोखंडे यांना 4 लाख 86 हजार 820 तर आ. कांबळे यांना 3 लाख 66 हजार 625 मते मिळाली.

नगर दक्षिणेच्या जागेसाठी शरद पवार व माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मुख्यमंत्री फडणवीस यांनी जातीने लक्ष घातले होते. त्यासाठी वेगवेगळ्या व्युहरचना करण्यात आल्या होत्या. विखेंचा पराभव करण्यासाठी खुद्द पवारांनी नगर शहरात एक दिवस मुक्‍काम करून तीन सभा घेतल्या होत्या. तर जगतापांच्या पराभवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा तर झालीच पण मुख्यमंत्र्यांनी चार सभा घेतल्या होत्या. एवढी प्रतिष्ठेची लढत या जागेसाठी करण्यात आली होती. त्यामुळे नगर मतदारसंघामुळे शिर्डी मतदारसंघ झाकोळला गेला होता. या शिर्डीची जबाबदारी थोरातांवर होती. तसेच विखेंची जादू या मतदारसंघावर चालल्याने आ. कांबळेंचा पराभव झाला.

आज सकाळी 8 वाजल्यापासून औद्योगिक वसाहतीमधील वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणीला प्रारंभ झाला. सुरवातीला पोस्टल मते मोजण्यात आली. त्यानंतर ईव्हीएम मशीनची मते मोजण्यास सुरवात करण्यात आली. दोन्ही मतदारसंघासाठी प्रत्येकी 84 टेबलची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानुसार पहिल्या फेरीपासून नगरमध्ये डॉ. विखे तर शिर्डीत खा. लोखंडे यांनी मतांची आघाडी घेण्यास सुरवात केली. तेव्हापासून कल लक्षात आल्याने आ. जगताप समर्थकांमध्ये नाराजी दिसून आली. नगर व शिर्डी दोन्ही मतदारसंघांची मतमोजणी एकाच वेळी सुरू झाली तरी अतियश संथगतीने मतमोजणी प्रक्रिया सुरू असल्याने निकाल रेंगाळत होता.

काही फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण होवू देखील त्यांची आकडेवारी जाहीर केली जात नव्हती. नगर मतदारसंघापेक्षा शिर्डी मतदारसंघात मतमोजणीचे काम संथगतीने सुरू होते. पोस्टल मते मोजल्यानंतर लगेच ईव्हीएम मशीनच्या मतांची मोजणी सुरू होणे अपेक्षित होते. परंतू ते झाले नाही. काही टेबलांवर पहिली फेरी पूर्ण झाली असतांना दुसऱ्या फेरीच्या मशिनची वाट पहावी लागत होती. नगरमधून विखे व शिर्डीमधून लोखंडे यांनी पहिल्या फेरीपासून जी आघाडी घेतली होती. ती शेवटच्या 24 व्या फेरीपर्यंत आघाडी कायम ठेवली.

शिर्डीमधून आ. कांबळे यांच्या विजयाचा दावा करणाऱ्या कॉंग्रेस आघाडीच्या नेत्यांनी केला होता. परंतू कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा, शिर्डी या चारही मतदारसंघातून लोखंडेंना आघाडी मिळाली. त्यामुळे आ. कांबळेंना अकोले व संगमनेरमधून काही प्रमाणात मिळालेल्या आघाडीवर समाधान मानावे लागले आहे. पहिल्या फेरीत 11 हजार 713 मतांची आघाडी विखेंनी घेतली. त्यानंतर दुसऱ्या फेरीत यात वाढ झाली. ही आघाडी 24 हजार 165 मतांनी मिळाली. प्रत्येकी फेरीत सुमारे 10 ते 13 हजार मतांची वाढ विखेंना मिळाली.

सातव्या फेरीत काय ते मताधिक्‍य घटले. केवळ 1 हजार 348 एवढीच आघाडी मिळाली. त्या सातव्या फेरीत जगताप यांना नगर शहरातून जास्तचे मतदान झाले. तसेच ते अन्य विधानसभा मतदारसंघातून जगताप यांना मतांची आघाडी मिळाली. परंतू ही आघाडी केवळ या फेरीपुरतीच राहिली. त्यानंतर आठव्या फेरीपासून विखेंनी जी आघाडी घेतली. त्यात जगताप चांगलेच पिछाडीवर पाहिले. विखेंना मागे टाकण्याची संधी मिळाली नाही. ती स्थिती शिर्डीमध्ये राहिली. प्रत्येक फेरीत लोखंडे यांना सात ते साडेसात हजार तर काही फेऱ्यांधमध्ये 10 हजार मतांची आघाडी मिळाली. लोखंडे यांना मोदी लाटेचा फायदा झाला. त्यात दोन भाजपच्या आमदारांनी त्यांना मदत केली. नगर मतदार संघाचे व्हीव्हीपॅट 5 टक्के मतमोजनी रात्री उशीरा पर्यंत मतमोजनी सुरू होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)