सेप्टिक टँकमध्ये सात कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू 

नवी दिल्ली – गुजरातमधील वडोदरा येथे एका हॉटेलच्या सेप्टिक टॅंकमध्ये सात कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. यामध्ये सफाई कर्मचाऱ्यांसोबत हॉटेलमधील काही स्टाफ़चाही समावेश आहे. सेप्टिक टॅंकच्या सफाईदरम्यान ही घटना घडली. हॉटेल मालकाच्या निष्काळजीपणामुळे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दाभोई तालुक्यातील फार्तिकुई गावातील ही घटना आहे. दर्शन हॉटेलमध्ये महेश पतनवडिया, अशोक हरिजन, बृजेश हरिजन आणि महेश हरिजन सेप्टिक टॅंक साफ करण्याकरिता गेले होते. हॉटेलमधील कर्मचारी विजय चौधरी, सहदेव वसावा आणि अजय वसावा हेही त्यांची मदतीसाठी त्याठिकाणी उपस्थित  होते.  पहिल्यांदा पतनवडिया टॅंक साफ करण्यासाठी उतरले. परंतु, खूप वेळ झाला तरीही ते बाहेर न आल्याने  अशोक, बृजेश आणि महेश टँकमध्ये उतरले. हे चारही  जण बाहेर न आल्याने चौधरी, सहदेव आणि अजय त्यांच्या मदतीसाठी टॅंकमध्ये उतरले. परंतु, टॅंकमध्ये गॅसचे प्रेशर जास्त असल्याने सातही  जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलीस पुढील तपास करत आहेत.

https://twitter.com/ANI/status/1139763067737088004

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)