रावेतकर करंडक स्पर्धेत 150 खेळाडू सहभागी होणार

सोलारीस क्‍लब अजिंक्‍यपद टेनिस स्पर्धा

पुणे – सोलारीस क्‍लब तर्फे रावेतकर करंडक सोलारीस क्‍लब अखिल भारतीय अजिंक्‍यपद 16 वर्षाखालील टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून स्पर्धेत देशातील 150 हून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा सोलारीस क्‍लब, मयुर कॉलनी, कोथरूड येथे 3 ते 5 नोव्हेंबर 2018 या दरम्यान होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी बोलताना सोलारीस क्‍लबचे सीईओ हृषीकेश भानुशाली यांनी सांगितले की, स्पर्धेचे हे दहावे वर्ष असून स्पर्धेत सुमारे 150 हून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा 16 वर्षाखालील मुले व मुलींच्या राष्ट्रीय मानांकन गटात होणार आहे. स्पर्धेत एकेरी व दुहेरी गटाचे सामने होणार आहेत. स्पर्धेत महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक, मध्यप्रदेश, गोवा व छत्तीसगढ या राज्यातील खेळाडू सहभागी होणार आहेत.

क्‍लबच्यावतीने जानेवारी 2017 महिन्यात पुरूषांच्या वरिष्ठ स्पर्धेचे मयुर कॉलनी येथे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले होते, असे भानुशाली यांनी सांगितले. स्पर्धेत देशातील 16 वयोगटातील सर्वोत्तम राष्ट्रीय मानांकन असलेले खेळाडू सहभागी झाले आहेत.

या स्पर्धेव्दारे शिष्यवृत्ती पारितोषिके व इतरही आकर्षक बक्षीसे, प्रशस्तीपत्रक व करंडक देण्यात येणार आहेत. ही स्पर्धा एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली आयोजित करण्यात येत आहे. याशिवाय स्पर्धेतील विजेत्यांना 15 गुण, उपविजेत्याला 10, उपांत्य फेरीतील खेळाडूला 7 तर, उपांत्यपूर्व फेरीतील खेळाडूला 5 गुण मिळणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)