पुणे – दिलवाले फ्रेन्डस् ग्रुप आयोजित मोरया करंडक – २०२४ चे आयोजक बाळा कुऱ्हाडे व मित्र परिवाराने भव्य फुल पिच टेनिस बॅाल क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक १ लाख रूपये रोख रक्कम, द्वितीय क्रमांक ७५ हजार रूपये , तृतीय क्रमांक ५५ हजार रूपये व ट्रॅाफी असे पारितोषिके देण्यात आले.
महाअंतिम फेरीच्या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे प्रदेश काँग्रेसचे सेक्रेटरी व माजी आमदार मोहन जोशी, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य कार्यकारीणी सदस्य शैलेश विटकर, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मनिष आनंद , भाजप शिवाजीनगर उपाध्यक्ष डॅा.अपर्णा या गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विजयी संघांना पारितोषिक देण्यात आली.