प्रियांका चतुर्वेदी यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी वर्णी

मुंबई – प्रियांका चतुर्वेदी यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचा राजीनामा देत शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आज शिवसेना पक्षाने प्रियांका चतुर्वेदी यांना पक्षाच्या उपनेतेपदी नियुक्ती केली आहे.

काही दिवसांपूर्वीच मातोश्रीवर झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अन्य काही प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत प्रियांका चतुर्वेदी यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. दरम्यान, प्रियंका चतुर्वेदी यांनी काँग्रेसमध्ये गुंडांना स्थान मिळत असल्याचा आरोप करत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे त्यांनी राजीनामा पाठवला होता. त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसला हा मोठा झटका बसला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)