राज स्टाईलमध्ये आशिष शेलारांचे देखील प्रेझेंटेशन ‘बघाच तो व्हिडीओ’

मुंबई – महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यापासून कार्पोरेट प्रेझेंटेशनचा वापर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीकेचे झोड उठविणाऱ्या सभा महाराष्ट्रभर घेतल्या. ‘लाव रे तो व्हिडीओ’ अशी राजगर्जना करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, तथा अनेक भाजप नेत्यांच्या भाषणाचे व्हिडीओ सादर करून भाजपवर खोटी आश्वासने दिल्याचे आरोप लावले.

दरम्यान, आज भाजपतर्फे राज ठाकरे यांनी आपल्या सभांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी तथा इतर भाजप नेत्यांवर लावलेल्या आरोपांचे खंडन करण्यात आले असून राज ठाकरे यांना त्यांच्याच शैलीमध्ये उत्तर देण्यात आले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की मुंबई येथील रंगशारदा सभागृहामध्ये बोलताना भाजप नेते आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांनी महाराष्ट्रभर सभा घेऊन भाजपवर लावलेले आरोप खोडून काढले आहेत. आशिष शेलार यांनी यावेळी बोलताना ‘बघाच तो व्हिडीओ’ असं म्हणत मनसे प्रमुखांतर्फे लावण्यात आलेल्या आरोपांपैकी १९ आरोपांचे राज ठाकरे यांच्याच स्टाईलमध्ये प्रतिउत्तर दिले आहे.

आशिष शेलार यांनी यावेळी बोलताना राज ठाकरेंद्वारे दाखविण्यात आलेल्या व्हिडीओ क्लिप्स तथा सांगण्यात आलेल्या आकडेवारीच्या सतत्येबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करताना राज ठाकरेंनी जमवलेली माहिती ही अनन्व्हेरीफाईड सोर्सेसद्वारे जमवली असल्याने ती माहिती खोटी असल्याचं म्हंटल आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.