#लोकसभा2019 : बंगलाच्या रायगंजमध्ये 3 मतदान केंद्रांवर फेर मतदान

कोलकाता – पश्चिम बंगालमधील रायगंज लोकसभा मतदारसंघातील तीन मतदान केंद्रावर 29 एप्रिल रोजी फेर मतदान होणार असल्याची घोषणा शुक्रवारी पश्चिम बंगालचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी केली आहे.

माहितीनुसार, इस्लामपुर विधानसभा क्षेत्रातील (19) ढोलोगाछ एस.एस.के आणि (37) पाटागोरा बालिका विद्यालय या मतदान केंद्रावर फेर मतदान होणार आहे. याशिवाय गोलपोखर विधानसभा क्षेत्रातील (191)लोहागाछी आदि बासीपाडा एफ.पी. विद्यालय याठिकाणी सुध्दा फेर मतदान होणार आहे. मतदान सकाळी 7 ते सांयकाळी 6 दरम्यान होईल. रायगंजमध्ये एकूण 1623 मतदान केंद्र आहेत.

दरम्यान, रायगंज संसदीय मतदारसंघात 18 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्यात मतदान झाले होते, यावेळी हिंसाचार झाला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.