नवी दिल्ली – अवैधरित्या खणनप्रकारणी समाजवादी पक्षाचे नेते गायत्री प्रजापती यांच्या घरावर सीबीआयने छापा मारला आहे. याप्रकरणी सीबीआयने अमेठीस्थित गायत्री प्रजापती यांच्या घरासह अन्य २२ ठिकाणी छापेमारी केली आहे. यासंबंधी प्रजापती यांच्या कुटुंबीयांची चौकशी केली जात आहे. दरम्यान, गायत्री प्रजापती सध्या बलात्कार प्रकरणी अटकेत आहे.
समाजवादी पक्षाची सत्ता असताना गायत्री प्रजापती उत्तरप्रदेशचे खणन मंत्री होते. त्यांच्यावर अवैधरित्या खणनप्रकरणी अनेक आरोप आहेत. त्यांच्यावर सामूहिक बलात्काराचा आरोपही असून सध्या ते जेलमध्ये आहेत.
CBI is conducting raids at 22 locations in Uttar Pradesh and Delhi; CBI raid also underway at the premises former UP Minister Gayatri Prajapati in connection with illegal mining case. (Visual from premises of UP Minister Gayatri Prajapati in Amethi) pic.twitter.com/gfFjDnfC0k
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) June 12, 2019
काय आहे प्रकरण
२०१२ पासून २०१६ पर्यंत समाजवादी पक्ष सरकारमध्ये हा खनन घोटाळा झाला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआय घोटाळ्याची चौकशी करीत आहे. २८ जुलै २०१६ रोजी अवैध खनन तपासणीसाठी आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. तपासणीत सीबीआयने २०१२-१६ दरम्यान हमीरपुर जिल्ह्यात बेकायदेशीर खाणींचा पुरावा आढळला होता, ज्यामुळे सरकारी महसूलात प्रचंड प्रमाणात घट झाली होती.