मायावतींचा बसप सर्वात श्रीमंत पक्ष

तब्बल 669 कोटींचा बॅंक बॅलेन्स
नवी दिल्ली – बॅंक बॅलेन्सच्या बाबतीत मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाने (बसप) इतर सर्व राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांना मागे टाकले आहे. बसपने निवडणूक आयोगाकडे 25 फेब्रुवारी रोजी आपल्या एकूण खर्चाची माहिती दिली असून यानुसार राजधानी दिल्लीतील सरकारी बॅंकांच्या शाखेमधील आठ वेगवेगळ्या खात्यांमध्ये एकूण 669 कोटी रुपये डिपॉजिट आहेत.

2014 लोकसभा निवडणुकीत आपले खातेही खोलू न शकलेल्या बसपने आपल्या हातात सध्या 95.94 लाख इतकी रोख रक्कम असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, दुसऱ्या स्थानावर समाजवादी पक्ष असून पक्षाच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये एकूण 471 कोटी रुपये आहेत. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणामधील विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाचा कॅश डिपॉझिट 11 कोटींनी कमी झाला.

कॉंग्रेस या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. कॉंग्रेसकडे 196 कोटींचा बॅंक बॅलेन्स आहे. मात्र ही माहिती गतवर्षी 2 नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाला देण्यात आलेल्या माहितीच्या आधार देण्यात आली आहे. कॉंग्रेसने मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत झालेल्या विजयानंतर आपल्या बॅंक बॅलेन्सची माहिती अपडेट केलेली नाही.

मात्र, भाजप या यादीत प्रादेशिक पक्षांच्याही मागे पडली आहे. भाजप टीडीपीनंतर पाचव्या स्थानावर आहे. भाजपकडे 82 कोटींचा बॅंक बॅलेन्स, तर टीडीपीजवळ 107 कोटींचा आहे. भाजपचा दावा आहे की, 2017-18 मध्ये मिळालेल्या 1027 कोटींपैकी 758 कोटी खर्च करण्यात आले. कोणत्याही पक्षाकडून खर्च करण्यात आलेली ही सर्वात जास्त रक्कम आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)