कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस; 60 बंधारे पाण्याखाली

10 हुन अधिक मार्ग बंद
कोल्हापूर – 
गेल्या 24 तासांहून अधिक वेळ कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून जिल्ह्यातील 60 बंधारे पाण्याखाली गेले आहेत तर राधानगरी धरण 60 टक्के भरलं आहे. पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा, चंदगड मध्ये अतिवृष्टी सुरू असून अनेक नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्ये जनजीवन ठप्प झाले आहे. गगनबावडा तालुक्यात गेल्या 24 तासात सर्वाधिक 122 मिलीमीटर पाऊसाची नोंद झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

आज दुपारी 12 पर्यंत पंचगंगा नदीची पाणीपातळी 35 फुटांवर पोहोचली आहे. त्यामुळे नदीकाठच्या परिसरातील सर्वच मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. पावसामुळे कोल्हापूर शहरातील कसबा बावडा, मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, राजारामपुरी चौक, शाहूपुरी या ठिकाणच्या सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर इशारा पातळी गाठू शकेल अशी परिस्थिती आहे. जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 594.35 मिमी पावसाची नोंद जिल्ह्यातील 12 मार्ग बंद ; पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)