लोणावळ्यात पुन्हा धुव्वाधार!

लोणावळा – लोणावळा शहरात सध्या धुव्वाधार पाऊस पडत आहे. शहरात बुधवारी सकाळी साडेसात ते गुरुवारी सकाळी साडेसात वाजेपर्यंत 24 तासांत तब्बल 301 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. मागील विस दिवसांपासून याठिकाणी सतत पडत असलेल्या धो धो पावसाने मागील वर्षीची सरासरी ओलांडली असून गुरुवारी (दि. 11) सकाळपर्यंत शहरात 1853 मिलिमीटर पाऊस नोंदविण्यात आला आहे.

बुधवारी रात्रभर कोसळलेल्या धो धो पावसामुळे शहरातील सखल भागात अनेक ठिकाणी पाणी भरण्याच्या घटना घडल्या. नांगरगाव भागात जाधव कॉलनी येथे मोठ्या प्रमाणात पाणी भरले होते. त्यामुळे तेथील नागरिकांना घराबाहेर पडणे देखील मुश्‍किल झाले होते. रस्ते व मोकळ्या जागांना ओढ्या नाल्याचे स्वरुप आले होते. याशिवाय तुंगार्ली येथील बद्रीविशाल सोसायटीमध्ये देखील पाणी भरले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)