नाशिक फाट्यापर्यंतचे बॅरीगेटस्‌ तत्काळ हटवा

30 एप्रिलपर्यंतची डेडलाईन : पालिकेच्या मेट्रोला सूचना

पिंपरी –
मेट्रोच्या कामामुळे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नगारिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सातत्याने होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पिंपरी ते नाशिक फाटा दरम्यान काम पूर्ण झालेल्या ठिकाणचे बॅरीकेडस्‌ हटविण्याची सूचना महापालिकेच्या वतीने मेट्रो प्रशासनाला करण्यात आली. त्यासाठी 30 एप्रिल ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.

स्थायी समिती सभापतींच्या प्रमुख उपस्थितीत मेट्रो आणि महापालिका अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक नुकतीच महापालिका भवनात पार पडली. यावेळी ही सूचना ही सूचना करण्यात आली. बैठकीला मेट्रोचे कार्यकारी संचालक गौतम बिऱ्हाडे, महापालिकेचे सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, बापू गायकवाड आदी उपस्थित होते. या बैठकीत मेट्रोच्या कामाची माहिती घेण्यात आली. शहरातील सर्वात महत्वाचा रस्ता अशी जुन्या पुणे-मुंबई महामार्गाची ओळख आहे. पहिल्या टप्प्यात पिंपरीपर्यंतच्या कामाला मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात मेट्रोचा विस्तार निगडीपर्यंत केला जाणार आहे.

महामार्गावरील फिनोलेक्‍स चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या दरम्यानचे काम केव्हा पूर्ण होईल, याबाबत कोणतीही माहिती मिळत नाही. मात्र, एचए कंपनीजवळ काही बॅरीगेटस्‌ काढल्याने या ठिकाणीवाहतूक कोंडी होत नाही. मात्र पुढील मार्गावर सर्वत्र बॅरीगेटस्‌ असल्याने वाहतुकीची कोंडी होते. या सर्व भागाची मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करावी. तसेच काम पूर्ण झालेल्या ठिकाणचे बॅरीगेटस्‌ काढून टाकावेत तशा सूचना काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना द्याव्यात व शक्‍य त्याठिकाणी रात्री काम करण्यावर भर देऊन वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)