राहुल गांधींना नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून गृहमंत्रालयाची नोटीस 

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भारतीय नागरिकत्वावर प्रश्न उपस्थित झाल्यावर आता गृहमंत्रालयानेही आज नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागितले आहे. राहुलच्या नागरिकत्वावर आणि शैक्षणिक पात्रतेवर प्रश्न उपस्थित करणारे एक पत्र भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामींनी गृहमंत्रालयाला पाठविले होते. यानंतर गृहमंत्रालयाने राहुल गांधींना नोटीस पाठविली असून १५ दिवसांत स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांचे नागरिकत्व आणि शैक्षणिक पात्रतेचा मुद्दा अमेठीतील एका अपक्ष उमेदवाराने काही दिवसांपूर्वीच उपस्थित केला होता. मात्र, यानंतर निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला होता. परंतु, या प्रकरणात राहुल गांधी यांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे नाहीत.

https://twitter.com/ANI/status/1123091150817103882

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)