लाखणगाव – सध्या मोठ्या प्रमाणावर तापमानात वाढ झाली आहे, त्यामुळेच लाखणगांव, देवगाव, काठापूर,पोंदेवाडी इत्यादी गावांतील तरुण आणि बालचमू उष्णतेपासून वाचण्यासाठी विहीर, तलाव, नदीत पोहण्याचा आनंद घेत आहेत.
जून महिना सुरू झाला तरी उन्हाचा पारा अजूनही चढताच आहे. त्यामुळेच उष्ण झळांपासून वाचण्यासाठी थंड पाण्यात पोहण्याचा मार्ग शाळकरी विद्यार्थ्यासह बालचमूंनी अवलंबला आहे. विहीर, तलावात आणि नदीमध्ये सध्या पोहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. काठापूर बुद्रुक येथील भोकरवाडीमधील विहिरीवर सध्या लहान मुले-मुली पोहताना दिसत आहेत.