– सादिक सय्यद (प्रतिनिधी)
पाचगणी : महाबळेश्वर पासून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवसागर जलाशयात वाळणे गावातील तीन मुली पोहायला गेल्या असताना दोन मुलीचा दुर्दैवी मृत्यु झाला. सोनाक्षी रामचंद्र सुतार (वय १३) वाळणे , सोनाक्षी तानाजी कदम ( वय १३) वाळणे यामध्ये तीसरी मुलगी सृष्टी सुनिल नलावडे वय १३ हीची प्रकृती गंभीर असून महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहे.
महाबळेश्वर पोलिस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी, की सदर घटना सकाळी साडाबारा वाजताच्या सुमारास वाळणे या गावात घडली असून तापोळा परिसरात मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे दुरध्वनी वरून माहिती कळविण्यात उशीर झाला.
एका महिलेने आकल्पे या गावातून आपल्या पतीस गावात घडलेली माहिती दिल्यामुळे महाबळेश्वर पोलिस ठाण्यात एक वाजण्याच्या सुमारास घटनेची माहिती मिळताच पोलिस हवालदार संतोष शेलार यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. यामध्ये दोन मुलींचा मृत्यू झाला असल्याचं आढळून आले.
दोन मृत झालेल्या सोनक्षी रामचंद्र सुतार (वय १३) वाळणे ,सोनीक्षी तानाजी कदम ( वय १३) वाळणे झालेल्या मुली सात वाजलेच्या सुमारास महाबळेश्वर ग्रामीण रूग्णालय शवविछेदनासाठी दाखल करण्यात आल्या यावेळी महाबळेश्वर ग्रामीण रूग्णालयात वाळणे व परिसरातील स्थानिक नागरिकानी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
महाबळेश्वर पोलिस ठाण्यात शुभांगी सुनिल तांबे वय-43 खबरी जबाब दिला की आशा सेविका वाळणे गावात गेले 7 वर्षापासुन नोकरी करीत आहे. रविवार रोजी सकाळी मी माझे घरी असताना माझी मुलगी हर्षदा सुनिल तांबे हीचे बरोबर आमचे गावातील तिच्या चार मैत्रीनी आर्या दिपक नलावडे (वय 12 ) सुष्ठी सुनिल नलावडे (वय 13) सोनाक्षी तानाजी कदम (वय 12 )सोनाक्षी रामचंद्र सुतार (वय 12) सर्व रा. वाळणे महाबळेश्वर या अभ्यास करण्यासाठी माझ्या मुलीकडे सोबत आल्या होत्या.
मात्र, त्यामळे आमच्या घराजवळ असले धरणाचे दिशेणे मुलींचा आरडा ओरडा केल्याचा आवाज ऐकु आल्याने मी आवाजाच्या दिशेने धरणाकडे गेले त्या वेळी चारही मुली पाण्यामध्ये बुडत असल्याचे मला दिसून आले. धरणाच्या पाण्यात उडी मारली व त्या पैकी आर्या दिपक नलावडे, सुष्ठी सुनिल नलावडे आणि सोनाक्षी रामचंद्र सुतार यांना पाण्यातून बाहेर काढले.
त्यानंतर धरणात असले मच्छीमार लोकांनी बोटीनी येवुन सोनाक्षी तानाजी कदम हीस पाण्यातुन बाहेर काढले मात्र, सोनाक्षी तानाजी कदम वय-12 वर्ष, सोनाक्षी रामचंद्र सुतार वय 12 वर्ष ह्या मयत झाल्याचे आढळून आले.
सृष्टी सुनिल नलावडे (वय १३ ) हीची प्रकृती गंभीर असून महाबळेश्वर ग्रामीण रूग्णालय मध्ये अधिक उपचार घेत आहे. सध्या महाबळेश्वर तपास पोलिस निरिक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलिस उपपोलिस निरिक्षक रऊफ इनामदार व हवालदार संतोष शेलार करीत आहे.