कवठे -शिरगाव (ता. वाई) येथील ऋषिकेश ज्योतिराम सावंत या 25 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. अधिक माहिती अशी, मुळचा कोरेगाव तालुक्यातील घेगेवाडी येथील ऋषिकेश हा सात वर्षांपूर्वी वडिलांचा मृत्यू झाल्याने आई, बहिण भावासह शिरगाव येथे मामा शरद सदाशिव इंगवले यांच्याकडे राहत होता.
तो डंपरवर चालक म्हणून काम करुन आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत होता. 6 जुलै रोजी मध्यरात्री शिरगाव येथील ओढ्याच्या कडेला असलेल्या शिवार नावाच्या शिवारात मध्यरात्री चिंचेच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून त्याने आत्महत्या केली.
याबाबतची माहिती भुईंज पोलीस ठाण्याचे स.पो.नि. श्याम बुवा, पोलीस उपनिरीक्षक आर. एस. भंडारे, पोलीस हवालदार चंद्रकांत मुंगसे, सचिन नलवडे यांना मिळताच हे सर्वजण घटनास्थळी दाखल झाले.