Lok Sabha Election 2024 | 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी राहुल गांधी यांचा प्रचार सुरू आहे. शनिवारी 18 मेला राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा चर्चेसाठी आव्हान दिले. प्रत्येक मुद्यावर चर्चा करण्यासाठी मी तयार आहे, मात्र पंतप्रधान त्यासाठी तयार नसल्याचे सांगितले. राहुल गांधी यांनी सांगितले.
राहुल गांधी यांनी नुकत्याच झालेल्या मुलाखतीचा संदर्भ देत पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला. राहुल गांधी म्हणाले,’काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी त्यांच्या चमचांना मुलाखत दिली. त्यांना हिंदू-मुस्लिम यावर प्रश्न विचारण्यात आले. ते सांगत होते की, लहान असताना ईदच्या वेळी मुस्लिम बांधव जेवण पाठवत असत. यावर राहुल गांधी म्हणाले मोदीजी तुम्ही शाकाहारी आहेत का?’ असा प्रश्नही त्यांनी केला आहे.
राहुल गांधींनी X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट केले आणि म्हटले की, ‘मी पंतप्रधानांशी चर्चेचे आमंत्रण स्वीकारून एक आठवडा झाला आहे. आजपर्यंत त्यांच्याकडून कोणतेही उत्तर आलेले नाही. ‘मित्र मीडिया’च्या कौटुंबिक वातावरणात ते फक्त ‘स्क्रिप्टेड इंटरव्ह्यू’ देण्यात व्यस्त आहे. जनतेला संबोधित करताना राहुल गांधींनी विचारले की, मोदीजी, खऱ्या मुद्द्यांवर बोलायला का घाबरता?’
या संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय – राहुल गांधी
काँग्रेस नेते राहुल गांधी जनतेला संबोधित करताना म्हणाले की, ‘या संविधानाचे रक्षण करणे हे आमचे ध्येय आहे.’
नरेंद्र मोदी चर्चा करू शकत नाहीत – राहुल गांधी
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत राहुल गांधी म्हणाले की, ‘त्यांनी 5-10 पत्रकारांना 30-35 मुलाखती दिल्या आहेत. तर 2-3 विचारवंत आणि पत्रकारांनी मला पत्रे लिहून जाहीर घोषणा केली की लोकशाहीत वादविवाद आवश्यक असून पीएम मोदी आणि राहुल गांधी यांच्यात थेट चर्चा व्हावी’ मी सुद्धा या संदर्भात पत्र नरेंद्र मोदींना लिहिले होते. मी तयार आहे, नरेंद्र मोदींना वाटेल तिथे माझ्याशी चर्चा घालू शकतात. तुला काय वाटतं, मोदी माझ्याशी चर्चा डिबेट घालायला येईल का? नाही, ते हे करू शकत नाही… नरेंद्र मोदी डिबेट करू शकत नाहीत.
हे वाचाल का ? “तुम्ही भाजपा किंवा ‘फडतूणवीस’चे नोकर नाहीत” ; उद्धव ठाकरेंची उपमुख्यमंत्र्यांवर टीका,पोलिसांना इशारा