सातारा – जिल्ह्यातील 11 जणांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने मंगळवारी सकाळी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 1372 झाली आहे. तर तीन करोनाबाधितांचा मृत्यू झाला असून करोनामुळे आतापर्यंत 57 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कान्हरवाडी (ता. खटाव) येथील 75 वर्षीय पुरुष, फडतरवाडी (ता. फलटण) येथील 42 वर्षीय पुरूष व जिहे (ता. सातारा) येथील 58 वर्षीय पुरुष अशा तीन करोनाबाधितांचा क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात रात्री उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशीही माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात फडतरवाडी (ता. फलटण) येथील 42 वर्षीय करोनाबाधित पुरुषाचा उपचारदरम्यान आज सकाळी मृत्यू झाला असल्याचे डॉ. गडीकर यांनी सायंकाळी सांगितले. सोमवारी रात्री उशीरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालये व करोना केअर सेंटरमध्ये येथे उपचार घेत असलेल्यामधील निकट सहवासातील 2, प्रवास करुन आलेले 3, सारीचे 5 व आरोग्य कर्मचारी 1 अशा एकूण 11 नागरिकांचा अहवाल करोनाबाधित आला आहे.
या 11 जणांमध्ये सातारा तालुक्यातील धनगरवाडी, कोडोली येथील 48 वर्षीय पुरुष, करंडी येथील 59 वर्षीय पुरुष, कारंडवाडी येथील 30 वर्षीय पुरुष, क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील 42 वर्षीय पुरुष आरोग्य कर्मचारी, जावळी तालुक्यतील कुसुंबी येथील 35 वर्षीय पुरुष, कोरेगावच्या सुभाषनगर येथील 75 वर्षीय पुरुष, खंडाळा तालुक्यातील लोणंद येथील 42 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 60 वर्षीय पुरुष, पारगाव येथील 50 वर्षीय पुरुष, फलटण येथील 34 वर्षीय पुरुष, खटाव तालुक्यातील फडतरवाडी येथील 23 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
340 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयातील 27, कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 67 व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील 40, कोरेगावच्या ग्रामीण रुग्णालयातील 31, वाई येथील 23, शिरवळ येथील 72, रायगाव येथील 11, पानमळेवाडी येथील 26, मायणी येथील 16, खावली येथील 27 अशा एकूण 340 जणांच्या घशातील नमुने पुण्याच्या एनसीसीएस व कृष्णा मेडिकल कॉलेजकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.