पुणे : खेळताना तोल जाऊन विहिरीत पडून एका सहा वर्षीय मुलाचा शनिवारी मृत्यू झाला. मस्तान मुस्ताक शेख असे या मुलाचे नाव आहे.
कोंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक संतोष सोनावणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा खुर्द येथील भाग्योदय नगर येथील गल्ली क्रमांक २८ मध्ये मस्तान खेळत होता. खेळत असताना तोल गेल्याने ताे विहिरीत पडला. याबाबत तातडीने त्याच्या चुलत्याने तसेच आई-वडिलांनी अग्नीशमन दलाला कळविले.
तेव्हा अग्नीशमन दलाचे कर्मचारी व कोंढवा पोलिस चौकीचे अधिकारी सपोनी जाधव यांनी या मुलाला बाहेर काढले. प्रारंभी त्यास खाजगी दवाखान्यात नेण्यात आले. त्यानंतर त्यास ससून सर्वोपचार रूग्णालयात नेले असता, तपासणीपूर्वीच तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी जाहिर केले.